सामूहिक बलात्काराचा बदला सामूहिक बलात्कार

उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये गँगरेपचा बदला घेण्यासाठी आरोपीच्या बहिणीवर गँगरेप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आलाय. 

Updated: Sep 2, 2014, 12:40 PM IST
सामूहिक बलात्काराचा बदला सामूहिक बलात्कार title=

मुजफ्फरनगर : उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये गँगरेपचा बदला घेण्यासाठी आरोपीच्या बहिणीवर गँगरेप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आलाय. 

आपल्या बहिणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचा बदला घेण्यासाठी आणखी एक बलात्कार करण्यात आला. बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीच्या बहिणीला सहा जणांनी उचलून जंगलात नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला त्याच अवस्थेत जंगलात सोडून सगळे फरार झाले.

जेव्हा 19 वर्षांच्या या मुलीला शुद्ध आली तेव्हा ती जंगलातून येऊन ररस्त्यावर येऊन कोसळली. सोमवारी गावकऱ्यांच्या नजरेस ही मुलगी पडल्यावर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी या तरुणीला कित्येक तास स्टेशनमध्येच बसवून ठेवलं. यावेळी पीडित तरुणीसोबत एकही महिला पोलीसदेखील नव्हती. मीडिया इथं दाखल झाल्यानंतर पात्र पोलिसांनी पाच तरुणांवर गुन्हा नोंदवलाय. त्यानंतर मुलीला मेडिकल चेक अपसाठी पाठवण्यात आलं. 

गेल्या महिन्यात याच गावातील अर्जुन, सोनू आणि इतरांवर एका तरुणीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या प्रयत्नाचा आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणाची नोंद 26 ऑगस्ट रोजी ककरोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस मात्र हातावर हात धरून बसलेले दिसत आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.