एका पाठोपाठ एक सिलेंडर लगेच मिळणार

घरात काम करणाऱ्या स्त्रियांसाठी एक खूश खबर. आता घरातला गॅस लगेच संपला तरी २१ दिवस थांबण्याची गरज नाही. कारण आता स्वयंपाकाचा गॅस संपलाच तर तुम्ही कधीही गॅसचं बुकींग करू शकता. तसेच गॅस एजंसीला देखील आता गॅस लवकर द्यावा लागणार आहे.

Updated: May 8, 2014, 07:33 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, जोधपूर
गॅस उपभोक्त्यांसाठी एक खुशखबर... आता घरातला गॅस लगेच संपला तरी २१ दिवस थांबण्याची गरज नाही. कारण आता स्वयंपाकाचा गॅस संपलाच तर तुम्ही कधीही गॅसचं बुकींग करू शकता. तसेच गॅस एजंसीला देखील आता गॅस लवकर द्यावा लागणार आहे. अशी सवलतच आता खुद्द गॅस कंपनीनेच उपलब्ध करून दिली आहे.
मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत अनेक गॅस वापरणाऱ्या ग्राहकांचे दोन किंवा तीन सिलेंडर बाकी होते. आपल्या सब्सिडीतील गॅस वापरण्यासाठी अनेक लोकांनी गॅस सिलेंडर बूक देखील केला. पण गॅस कंपनीने ग्राहकांना सिलेंडर देण्यास नकार दिला. या कारणाने आर्थिक वर्ष संपेपर्यंत ग्राहकांचे हे सिलेंडर लॅप्स झाले.
हे समजताच, पेट्रोलिअम कंपन्यांनी गॅस एजंसीला आदेश दिला की, ग्राहकांनी बुकिंग नंतर २१ दिवसांची वाट न पाहता लगेच गॅस सिलेंडर ग्राहकांना उपलब्ध करून द्या. येणाऱ्या आर्थिक वर्षात ग्राहकांना १२ सिलेंडर मिळणार आहेत. १२ सिलेंडर नंतर ग्राहकांना सब्सिडी रहित सिलेंडर मिळेल. पेट्रोलियम कंपन्यांच्या या निर्णयामुळे आता गॅस घरी येण्याची जास्त वेळ वाट पहावी लागणार नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.