नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून झिका नावाच्या विषाणूने जगभरात थैमान घातलंय. यामुळे जगभरात आणीबाणीही जाहीर करण्यात आलीये. माहितीचा व्हिडीओ बातमीच्या खाली.
या विषाणूमुळे ब्राझीलमध्ये नवजात बालकांच्या मेंदूवर मोठा परिणाम दिसून आलाय. यामुळे मेदूंची वाढ अपुरी होते. तब्बल २१ देशांमध्ये हा विषाणू आढळून आलाय. भारतात अद्याप प्रादुर्भाव झाला नसला तरी केंद्र सरकारने यावर देखरेखीसाठी तांत्रिक गटाची स्थापना केलीये. तुम्हाला या विषाणूविषयी माहिती आहे का? हा कसा पसरतो याची माहिती जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ