नवी दिल्ली : मोदी सरकारने काळा पैशावर लगाम लावण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या. मात्र आता अशी बातमी येतेय की सरकार दर तीन ते चार वर्षांनी ५०० आणि २०००च्या नव्या नोटांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बदल करण्याचा विचार करतेय.
नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणातस अनेक ठिकाणी बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. अनेक विकसित देशांमध्ये दर तीन ते चार वर्षांनी नोटांमधील सुरक्षेचे फीचर्स बदलले जातात. मात्र आपल्या देशात मोठ्या किंमतीच्या नोटांमध्ये अनेक वर्षांपासून बदलच करण्यात आले नव्हते.
१००० रुपयांची नोट २०००मध्ये आली होती. त्यानंतर या नोटेमध्ये कोणताही बदल कऱण्यात आलेला नाही. तर १९८७मध्ये आलेल्या ५०० रुपयांच्या नोटेमध्ये गेल्या दहा वर्षाआधी बदल करण्यात आला होता.
चलनातील नव्या नोटांमध्ये अतिरिक्त सुरक्षेचे फीचर्स देण्यात आलेले नाहीये. या नोटांमधील फीचर्स हे जुन्या १००० आणि ५०० रुपयांच्या नोटांप्रमाणेच आहेत.