केरळमध्ये सीआरपीएफच्या ४०० जवानांना जेवणातून विषबाधा

केरळच्या पल्लीपुरम येथे भोजनातून सीआरपीएफच्या ४०० जवानांना विषबाधा झाल्याची घटना घडलीये. या सर्व जवानांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलीये.

Updated: Apr 2, 2017, 11:15 AM IST
केरळमध्ये सीआरपीएफच्या ४०० जवानांना जेवणातून विषबाधा

तिरुअनंतपुरम : केरळच्या पल्लीपुरम येथे भोजनातून सीआरपीएफच्या ४०० जवानांना विषबाधा झाल्याची घटना घडलीये. या सर्व जवानांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलीये.

भोजन केल्यानंतर या जवानांना पोटदुखी तसेच उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. १०९ जवानांना त्रिवेंद्रम मेडिकल कॉलेज रुग्णालयात आणण्यात आले. 

दरम्यान, या घटनेप्रकरणी सीआरपीएफने चौकशीचे आदेश दिलेत. तसेच तपासासाठी भोजनाचे नमुनेही घेण्यात आलेत.