पाटणा : बिहारचे मुख्यमंत्र्यांवर जनता दरबारात एका व्यक्तीने बूट भिरकावला आहे. मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यावर एका व्यक्तीने बूट भिरकावला, सुदैवाने मांझी यांना बूट लागलेला नाही.
मुख्यमंत्री मांझी हे जनता दरबारामध्ये नागरिकांच्या समस्या ऐकत होते. यावेळी एका युवकाने मांझी यांच्या दिशेने बूट भिरकावला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. तो छप्रा येथील रहिवासी आहे.
'गेल्या दोन वर्षांपासून जनता दरबारामध्ये येत आहे. परंतु, येथे काहीही होत नाही. केवळ जातीय राजकारण केले जात आहे', असं या युवकानं म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.