बाबा रामदेव यांनी शड्डू ठोकून कुस्तीचा आखाडा जिंकला

बाबा रामदेव यांनी या वयातही कुस्तीचं मैदान मारलं आहे, आपल्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या युवा कुस्तीपटूला त्यांनी एकदा नाही, तर दोन-दोन तीन-तीन वेळेस आस्मान दाखवलं आहे. बाबा रामदेव यांचे डावपेचही तसेच आहेत, त्यांचा कुस्ती खेळण्याचा उत्साह तर त्याहून दांडगा आहे.

Updated: Jan 5, 2015, 02:46 PM IST
बाबा रामदेव यांनी शड्डू ठोकून कुस्तीचा आखाडा जिंकला title=

हरिद्वार : बाबा रामदेव यांनी या वयातही कुस्तीचं मैदान मारलं आहे, आपल्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या युवा कुस्तीपटूला त्यांनी एकदा नाही, तर दोन-दोन तीन-तीन वेळेस आस्मान दाखवलं आहे. बाबा रामदेव यांचे डावपेचही तसेच आहेत, त्यांचा कुस्ती खेळण्याचा उत्साह तर त्याहून दांडगा आहे.

बाबा रामदेव यांचा उत्साह पाहून भल्याभल्यांना कुस्तीच्या मैदानात, लाल मातीत स्वत:ला रंगवून घ्यायला आवडेल, बाबा रामदेव यांनी ज्या उत्साहात समोरच्या मल्लाची पाठ टेकवलीय ते पाहण्यासारखं आहे. या वयातही बाबा रामदेव यांनी कुस्तीसाठी शड्डू ठोकले आणि मैदान जिंकलं , बाबा रामदेव यांचा हा आखाडा पाहण्यासारखा आहे.

पाहा बाबा रामदेव यांची कुस्ती

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.