अहमदाबाद : आंदोलनादरम्यान विष प्यायलेल्या युवकाचा आज मृत्यू झाला. उना येथे गोमांस बाळगल्यावरून दलित कुटुंबाला मारहाण झाली होती. या मारहाणीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनादरम्यान विष प्यायल्याने या युवकाचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर गुजरातमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. योगेश सारीखाडा असे राजकोटमधील राहणाऱ्या मृत युवकाचे नाव आहे.
योगेशने १९ जुलै रोजी आंदोलनादरम्यान विष प्राशन केले होते उपचारासाठी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र योगेशची प्रकृती बिघडल्याने अहमदाबाद येथील रुग्णालयात त्याला हलविण्यात आले होते.पण तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.