उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशातल्या कानपूरमध्ये एक अजब बाळ जन्माला आलं. काळाकुट्ट चेहरा असलेल्या या बाळाचं शरीर मात्र साधारण रंगाचं आहे.
धक्कादायक म्हणजे, या बाळाला 'काली माँ' म्हणत अनेक अंधश्रद्धाळूंनी हात जोडत आणि पायाला हात लावत या बाळाचं सोमवारी दर्शनही घेतलंय.
अधिक वाचा : मथुरेत जन्मलं दोन डोक्याचं बाळ; एकाचा रंग गोरा तर दुसरा काळा!
कानपूरमध्ये बलरामपूर या गावात ही मुलगी जन्माला आली होती. पण, जन्मानंतर केवळ अर्ध्यातासांतच तिचा मृत्यू झाला. पण, अंधश्रद्धाळू गावकऱ्यांनी मात्र याचा अर्थ 'आपल्यावर देवी कोपलीय' असा घेतला... आणि त्यासाठीच 'काली माँ' संबोधत या मृत लहान बाळाचे पाय धरले.
अधिक वाचा : जगातील सर्वात जास्त डार्क बाळ, काय आहे यामागच रहस्य?
या मृत बाळाच्या दर्शनासाठी त्यामुळेच एकच गर्दी जमली... अनेकांनी या मृत बाळाच्या चरणी पैसेही टाकले... ती रक्कम जवळपास १० हजारांच्या घरात गेली. या गर्दीमुळे त्या दिवशी या बाळाचे अंत्यविधीही शक्य झाले नाही. या बाळाच्या आईच्या - कृष्णाच्या घरात आजही भजन-किर्तन सुरू आहे.
अधिक वाचा : स्वत:च पेट घेणारं बाळ; डॉक्टरही चक्रावले!
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.