अमेरिकेने केला एपीजे कलाम यांचा अपमान

अमेरिकेने नेहमी प्रमाणेच सुरक्षेच्या नावाखाली भारताच्या माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा अपमान केला, अमेरिकेनं चौकशीच्या नावाखाली पुन्हा एकदा भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा अपमान केल्याची घटना घडली.

Updated: Nov 13, 2011, 10:33 AM IST

झी २४ तास वेब टीम, न्यूयॉर्क

अमेरिकेने नेहमी प्रमाणेच सुरक्षेच्या नावाखाली भारताच्या माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा अपमान केला, अमेरिकेनं चौकशीच्या नावाखाली पुन्हा एकदा भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा अपमान केल्याची घटना घडली.

न्यूयॉर्क विमानतळावर कलाम यांची दोन वेळा चौकशी करण्यात आल्यानंतर विमानातही सुरक्षा रक्षकांनी त्यांचे बूट आणि जॅकेट तपासणीसाठी घेतले. या सर्व घटनेनंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांनी भारताच्या राजदूत निरूपमा राव यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितल. तर याचप्रमाणे अनेक मान्यवरांना अश्या अपमानाला सामोरे जावे लागले होते

यापूर्वीही भारतात अमेरिकेच्या सुरक्षा विभागानं कलाम यांची चौकशी केली होती. परंतु भारताने चौकशीचे आदेश देताच  अमेरिकेने भारताच्या परराष्ट्र मत्र्यांना माफीनाम्याचे सविस्तर पत्र लिहून झालेल्या अपमानाबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त केली आहे.