गिलानी 'इमानदार' नाहीत!

पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी हे इमानदार व्यक्ती नाहीत, असं पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने आज म्हटलं आहे. आपल्या संवैधानिक शपथेवर कायम न राहिल्याबद्दल ताशेरेही त्यांच्यावर ओढले.

Updated: Jan 10, 2012, 11:45 PM IST

www.24tas.com, इस्लामाबाद 

पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी हे इमानदार व्यक्ती नाहीत, असं पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने आज म्हटलं आहे. आपल्या संवैधानिक शपथेवर कायम न राहिल्याबद्दल ताशेरेही त्यांच्यावर ओढले.

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या फाईल्स उघडण्याच्या न्यायालयाच्या आदशाचं पालन न केल्याबद्दल असं न्यायालयाने असं म्हटलं.

कोर्टाच्या पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाने झरदारींच्या भ्रष्टाचारासंबंधातील प्रकरणांबद्दल क्षमादान याचिका फेटाळून लावताना हायकोर्टाच्या आदेशांबद्दल पीपीपीच्या सरकारवर दबाव टाकत गिलानी हे ‘आदरास पात्र’ नाहीत अशी टीका केली.

आपली निष्ठा संविधानाप्रती न दाखवता आपल्या राजकीय पक्षाबद्दल दाखवण्याची चूक गिलानींनी केल्याचं खंडपीठाने म्हटलं आहे. गिलानी हे आदरणीय ल्यक्तिमत्व नसून त्यांनी आपली शपथ पाळली नाही.