www.24taas.com, न्यूयॉर्क
अमेरिकेने पुन्हा क्युबा, इराण, सुदान आणि सीरिया या चार देशांना दहशतवादाला प्रायोजत्व देणारे देश म्हणून घोषित केलं आहे. तसंच त्यांच्यावर शस्त्रांचा व्यापार आणि आर्थक सहाय्य इत्यादी गोष्टींवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.
अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने आपल्या आतंकवादावरील वार्षिक अहवालात स्पष्ट केलं आहे, “इराणला १९८४ साली आतंकवादाला प्रायोजकत्व पुरवणारा देश घोषित केलं होतं आणि २०११मध्येही इराण आतंकवादाला प्रायोजकत्व देतच राहिला.”
इराणमधील दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. अरब राष्ट्रांमधील अस्वस्थ राजरकीय घटनांचा फायदा घेण्यासाठीच इराणने हे पाऊल उचलल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. इराणच पश्चिमोत्तर अशिया आणि मध्य अशियामधील आतंकवादाला पैसा आणि शस्त्र पुरवत आहे, असं अमेरिकेचं म्हणणं आहे