www.24taas.com, नवी दिल्ली
'टाइम मॅगझिन'ने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा अपेक्षेपेक्षा कमी यश मिळविणारे अर्थात 'अन्डरऍचिव्हर' व्यक्ती म्हणून उल्लेख करताना गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना हिरो ठरविले आहे. नरेंद्र मोदी यांना 'चतूर राजकारणी' असा उल्लेख केला आहे.
मनमोहन सिंग यांच्या क्षमतेवर 'टाइम'च्या ताज्या अंकात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेय. टाइम अंकाच्या मुखपृष्ठावरच पंतप्रधानांचे छायाचित्र छापण्यात आले आहे. गेल्या वर्षी 'टाइम'ने मुखपृष्ठावर नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापले होते. तर तीन वर्षांपूर्वी 'टाइम'ने मनमोहन सिंग यांचा गौरव केला होता. लाखो नागरिकांचे आयुष्य बदलविणारा व्यक्ती म्हणून 'टाइम'ने त्यांचा उल्लेख केला होता. मात्र, आता त्यांच्या कामाबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याने आता काय प्रतिक्रिया उमटतात, याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, सिंग यांच्यासंदर्भात मंदावलेला विकास दर, आर्थिक सुधारणा आणि धोरणांची अंमलबजावणी न करण्यात आलेल्या अपशावरुन होत असलेल्या आरोपांचा ते सामना करु शकतील का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
टाइमने युपीए सरकारवर कडाडून टीकाही करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींवरुन जनतेचा विश्वास उडाला आहे. जनतेच्या हिताचे आणि रोजगार निर्मिती करणारे कायदे संसदेत अडकले आहेत. हे निश्चित चिंताजनक आहे, असे म्हटले आहे. तर नरेंद्र मोदी कसे हीरो आहेत ते म्हटले आहे. तेच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ते भाजपकडून पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. काँग्रेसच्या राहुल गांधींना आव्हान देऊ शकतात, असे गत वर्षी म्हटले होते.