तालिबानने केलं भारताचं कौतुक

आज अत्यंत आश्चर्यकारक घटना घडली आहे. आज अफगाणी तालिबानने भारताचं चक्क कौतुक केलं आहे. अमेरिकेने केलेल्या अवाहनाला आणि दबावाला भारत बळी न पडल्याबद्दल तालिबानने भारताचे कौतुक केलं आहे. तालिबानचं म्हणणं आहे की भारत हा या प्रांतातील अत्यंत महत्वाचा देश आहे, यात काहीच शंका नाही.

Updated: Jun 17, 2012, 08:12 PM IST

www.24taas.com, काबुल

 

आज अत्यंत आश्चर्यकारक घटना घडली आहे. आज अफगाणी तालिबानने भारताचं चक्क कौतुक केलं आहे. अमेरिकेने केलेल्या अवाहनाला आणि दबावाला भारत बळी न पडल्याबद्दल तालिबानने भारताचे कौतुक केलं आहे. तालिबानचं म्हणणं आहे की भारत हा या प्रांतातील अत्यंत महत्वाचा देश आहे, यात काहीच शंका नाही. भारताला अफगाणी नागरिकांच्या आशा, आकांक्षा,विश्वास आणि स्वातंत्र्य या गोष्टींची पुरेपुर कल्पना आहे. त्यामुळे अमेरिकेच्या नादी लागून भारत स्वतःचं नुकसान करणार नाही.

 

अमेरिकन संरक्षण मंत्री पनेटा काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये आले होते आणि त्यानंतर ते काबुल येथे रवाना झाले. मधल्या तीन दिवसांच्या काळात त्यांनी भारताला अफगाणिस्तानात अधिक सक्रिय व्हावं यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे २०१४पर्यंत बहुतेक अमेरिकन सैन्य अफगाण प्रांतातून निसटणार होतं. मात्र भारताने अमेरिकेच्या म्हणण्याला प्रतिसाद दिल्याबद्दल तालिबानने भारताचं कौतुक केलं आहे.

 

तालिबानचा प्रमुख मुल्ला ओमर म्हणाला, “भारतीय नागरिक तसंच सरकार अफगाणिस्तानातील युद्धाच्या विरोधात आहेत. तसंच अफगाणिस्तानाच्या मागण्यांचीही त्यांना पूर्ण जाणिव आहे.” तालिबानला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचं साथीदार आणि भारताचा वैरी मानलं जातं. त्यामुले तालिबानने अशा प्रकारे भारताचं कौतुक करणं ही आश्चर्याची बाब मानली जात आहे.