न्यूझीलंडमध्ये हेलिकॉप्टरचा चक्काचूर

न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमध्ये एका हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला. या हेलिकॉप्टरच्या मदतीनं ख्रिसमस ट्री लावले जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच ही घटना घडली.

Updated: Nov 28, 2011, 09:18 AM IST

झी २४ तास वेब टीम, न्यूझीलंड

 

ख्रिसमसला काही आठवडे राहिले असता ख्रिसमसच्या तयारीसाठी न्यूझीलंडमध्ये खास हेलिकॉप्टर दिमतीला दिले होते, पण दुर्दैवीपणे या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे,

 

न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडमध्ये  एका हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला. या हेलिकॉप्टरच्या मदतीनं ख्रिसमस ट्री लावले जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच ही घटना घडली... दुर्घटना होण्यापूर्वी हेलिकॉप्टर जमिनीपासून थोड्या अंतरावर चक्कर मारत होतं.त्यानंतर हे हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं... ही दुर्घटना प्रचंड लोकसंख्या असलेल्या भागात घडली मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या दुर्घटनेतून पायलटही बचावला.