पाकने केली क्षेपणास्त्राची चाचणी

सातशे किलोमीटरचा पल्ला गाठू शकणाऱ्या अण्वस्त्रवाहू 'हत्फ-७' या क्रूझ क्षेपणास्त्राची आज पाकिस्तानने यशस्वी चाचणी घेतली.

Updated: Jun 5, 2012, 04:41 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद

 

सातशे किलोमीटरचा पल्ला गाठू शकणाऱ्या अण्वस्त्रवाहू 'हत्फ-७' या क्रूझ क्षेपणास्त्राची आज पाकिस्तानने यशस्वी चाचणी घेतली.

 

पाकिस्ताचे सामर्थ्य वाढविण्यासाठी आणि राष्ट्रीय सरंक्षणासाठी या चाचण्या घेण्यात येत असल्याचे लष्कराच्यावतीने सांगण्यात आले. भारताला लक्ष्य करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राच्या मालिकेतील हे क्षेपणास्त्र आहे.

 

कमी उंचावर उडणे, लक्ष्याचा अचूकतेने वेध घेणे आणि उच्च गतिशीलता ही या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये आहेत. अज्ञात ठिकाणी ही चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आली, अशी माहिती पाकिस्तान लष्कराने दिली. गेल्या एक महिन्यात पाकिस्तानने घेतलेली ही पाचवी चाचणी आहे.