लादेनच्या तीन पत्नी, पाच मुलांना कोठडी

अमेरिकेने केलेल्या कावाईत कुप्रसिद्ध दहशतवादी ओसामा बिन लादेन मारला गेला असला तरी त्याच्या कुटुंबियांच्या मागील ससेमिरा सुटलेला नाही. लादेनच्या तीन पत्नी आणि पाच मुलांना न्यायालयाने कोठडी ठोठावली आहे.

Updated: Mar 19, 2012, 03:45 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद

अमेरिकेने केलेल्या कावाईत कुप्रसिद्ध दहशतवादी ओसामा बिन लादेन मारला गेला असला तरी त्याच्या कुटुंबियांच्या मागील ससेमिरा सुटलेला नाही. लादेनच्या तीन पत्नी आणि पाच मुलांना न्यायालयाने कोठडी ठोठावली आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात अमेरिकेने लादेनच्या पाकिस्तानमधील एबोटाबादमधील घरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ओसामा ठार झाला होता. मात्र, येथील घरामध्ये  लादेनचे कुटुंब राहत होते. लादेनला पाकिस्तानात आश्रय दिलेला नाही, असे पाकिस्तानने म्हटले होते. त्यामुळे पाकिस्तानला काहीही माहिती न देता अमेरिकेने पाकच्या हद्दीत घुसून बेधक कारवाई केली. या कारवाईत लादेन मारला गेला. यावेळी लादेनच्या घरीत तीन पत्नी आणि मुले राहत होती. परंतु, राहत असलेल्या ओसामाच्या कुटुंबीयांकडे व्हिसा नव्हता. त्यामुळे पाकिस्तानमध्ये ते अनधिकृत राहत असल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्या नुसार त्यांना अटक करण्यात आली होती. लादेनच्या कुटुंबियांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने  लादेनच्या तीन पत्नी व पाच मुलांना न्यायालयाने शनिवारी  नऊ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.