लाहौर : पाकिस्तानात रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या ७० वर जाऊन पोहोचली आहे, यात २२ मुलांचा समावेश होता, यात काही महिलांचाही मृत्यू झाला आहे. ईस्टरच्या गर्दीत हा स्फोट झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
या घटनेची जबाबदारी पाकिस्तानपासून वेगळ्या झालेल्या एका ग्रुपने घेतली आहे, जमात-उल-अहरार असं या गटातचं नाव आहे. सध्या हा गट तालिबानसोबत आहे. हा स्फोटात ख्रिश्चनांवर निशाणा साधण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानात तीन दिवसाचा शोक जाहीर करण्यात आला आहे, पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपला ब्रिटन दौरा रद्द केला आहे.