७०० भटक्या कुत्र्यांची पाकमध्ये हत्या

सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रवाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यांना आळा घालण्याची मागणी होत असते. मात्र, पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. चक्का भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये ७०० कुत्र्यांची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली.

PTI | Updated: Aug 5, 2016, 09:12 PM IST
७०० भटक्या कुत्र्यांची पाकमध्ये हत्या  title=

लाहोर : सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रवाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यांना आळा घालण्याची मागणी होत असते. मात्र, पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. चक्का भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये ७०० कुत्र्यांची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली.

कराची शहरात ७००हून अधिक कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्यात आले. गेल्या काही दिवसांत भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढल्याने कुत्र्यांना ठार करण्याचा निर्णय घेतला गेला.  शहरांमध्ये अनेक ठिकाणी कुत्र्यांचे मृतदेह रस्त्यावर दिसत आहेत.
 
कुत्र्यांना मारण्यासाठी मांसाहारातून विष देऊन ठर करण्यात आले. प्राणीमित्र या घटनेचा निषेध करत आहेत. मात्र लोकांना धोका असल्याने हा निर्णय घेण गरजेचे पाकिस्तानचे अधिकारी मोहम्मद झाहीद यांनी  सांगितले. कुत्र्याच्या चाव्याने ६,५०० लोक जखमी झालेत. त्यांना कराचीमधील जिन्नाह रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.