www.24taas.com, न्यू यॉर्क
अमेरिकेच्या न्यायालयाने आदेश दिलाय की कुख्यात अतिरेकी आणि धर्मगुरू अबू हमजा अल-मसरी याला नऊ ऑक्टोबरपर्यत औपचारिकरीत्या गुन्हे दाखल करण्याआधी ताब्यात ठेवण्यात येईल. ब्रिटनने हमजा आणि इतर चार संशयितांचे प्रत्यार्पण केले आहे. हमजाने अमेरिकविरूध्द चार वर्षे लढा दिल्यानंतर आता हमजाला संघीय न्यायालयात हजर केल गेलंय.
निष्पाप लोकांना बंदी करून ठेवण्यासाठी आणि अल कायदाला हल्ले करण्यास प्रवृत्त करण्यासाठी हमजावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. हमजाखेरिज अब्दुल बारी, खालिद अल फव्वाज, बाबर अहमद आणि सय्यद तल्हा अहसन यांनासुध्दा प्रत्यार्पित केलं गेलंय.खालिद अल फव्वाज आणि आदिल अब्दुल बारी हे हमजासोबत न्यूयॉर्कच्या न्यायालयात हजर राहिले होते. सय्यद तल्हा अहसन (३३) आणि बाबर अहमद (३८) यांना न्यू हेवन मध्ये हजर करण्यात आले होते.
हमजा आणि इतर संशियितांवर दहशवादाशी निगडीत अनेक आरोप त्यांच्या माथ्यावर आहेत. हमजावर असाही आरोप लावण्यात आलाय की त्या यमन येथे १९९८ ला दोन अमेरिकी नागरिक आणि १६ पर्यटकांना बंदी केले होते. दोषी करार लावल्यानंतर हमजा आणि बारी यांना जन्मठेपेची शिक्षा मिळू शकते.