पाकिस्तानच्या चायवाल्यानंतर नेपाळची भाजीवालीचा फोटो व्हायरल

 सध्या सोशल मीडियावर एक भाजीवालीचा फोटो व्हायरल होतोय. #tarkariwali हा हॅश टॅग वापरून खूप शेअर केला जात आहे. 

Updated: Nov 1, 2016, 11:14 PM IST
पाकिस्तानच्या चायवाल्यानंतर नेपाळची भाजीवालीचा फोटो व्हायरल

नवी दिल्ली :  सध्या सोशल मीडियावर एक भाजीवालीचा फोटो व्हायरल होतोय. #tarkariwali हा हॅश टॅग वापरून खूप शेअर केला जात आहे. 

आतापर्यंत या भाजीवालीचे दोनच फोटो समोर आले आहे. त्यात तिने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच डोक्याला भाजीच्या टोपल्या दोरीने अडकवल्या आहेत. तर दुसऱ्या फोटोत ती फोनवर बोलत आहे. 

नेपाली वेबसाइटनुसार हे फोटो गोरखा आणि चैतवन दरम्यान बनविलेल्या पुलाचा आहे. त्याच्याजवळच एक मार्केट आहे. या तरूणीची माहिती मिळू शकली नाही. ही तरूणी इतकी सुंदर आहे की लोक तिची खूप प्रशंसा करत आहेत. 

यापूर्वी असाच एक पाकिस्तानचा चहावाला व्हायरल झाला होता. तसेच चिनी ढोलवालीचाही फोटो व्हायरल झाला होता.