नवी दिल्ली : प्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांची 45 वर्षे जुनी सरोद गहाळ झाली आहे.
अमजद अली खान हे 28 जून रोजी ब्रिटीश एअरवेजच्या फ्लाईटने लंडनहून भारतात परतत होते, यावेळी ही सरोद गहाळ झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
सरोद गहाळ झाल्याच्या घटनेला दोन दिवस उलटले असले, तरी अजून ही सरोद सापडलेली नाही, ही सरोद 45 वर्षे जुनी होती, तसेच ती सरोद सहा कोटी रूपयांची असल्याचं सांगण्यात येत आहे.
अमजद अली खान यांनी यावर प्रतिक्रिया देतांना म्हटलं आहे, 'माझ्यासाठी ही सरोद अनमोल असून जीवापेक्षा प्रिय आहे, आणि जीवाची किंमत पैशांनी ठरवता येत नाही,' अशी प्रतिक्रिया उस्ताद अमजद अली खान यांनी दिली आहे.
ब्रिटीश एअरवेज आपल्या प्रवाशांची काळजी घेण्यास प्रसिद्ध आहे. जर या घटनेला ब्रिटीश एअरवेज कारणीभूत असेल, तर ब्रिटीश एअरवेज या सरोदची भरपाई उस्ताद अमजद अली खान यांना कशी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.