हॅम्बर्ग : फ्रान्सचं मासिक 'शार्ली एब्डो' वरील वादग्रस्त कार्टून्सचं प्रकाशन करणाऱ्या दैनिकावर हल्ला झाला आहे.
हॅम्बर्गमधील दैनिकाच्या इमारतीला आग लावण्याचा प्रयत्न झाला आहे, सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झालेलं नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 'हम्बर्गर मार्गनपोस्ट' या इमारतीच्या खिडकीतून पहिल्यांदा दगड फेकण्यात आले आणि नंतर काही जाळलेल्या वस्तू फेकण्यात आल्या.
यामुळे इमारतीच्या खालील दोन खोल्यांचं नुकसान झालं आहे.
'हम्बर्गर मॉर्गनपोस्ट' ने पॅरिसमधील 'शार्ली एब्डो' च्या ऑफिसवर झालेल्या हल्ल्यानंतर तीन वादग्रस्त कार्टुन्स छापले होते. या दैनिकाची हेडलाइन्स होती 'एवढं स्वातंत्र्य तर मिळायला हवंच'.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.