पॅरिस दहशतवादी हल्ला : दोन्ही अतिरेक्यांना ठार करण्यात यश

 पॅरिसमध्ये शार्ली हेब्दो या साप्ताहिक कार्यालयावर आत्मघाती हल्ला करणारे दहशतवादी शरीफ आणि सैद क्वॉची या दोघा बंधुना ठार करण्यात पोलिसांना यश आले.

Reuters | Updated: Jan 9, 2015, 10:35 PM IST
पॅरिस दहशतवादी हल्ला : दोन्ही अतिरेक्यांना ठार करण्यात यश title=

पॅरिस : पॅरिसमध्ये शार्ली हेब्दो या साप्ताहिक कार्यालयावर आत्मघाती हल्ला करणारे दहशतवादी शरीफ आणि सैद क्वॉची या दोघा बंधुना ठार करण्यात पोलिसांना यश आले.

पॅरिसच्या उत्तर-पूर्व भागात पोलीस आणि दोन  दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू होती.  दोन संशयित दहशतवादी एका इमारतीत शिरले असून त्या इमारतीला पॅरिस पोलिसांनी घेराव घातल्याचे वृत्त होते. एका गोदामात हे दोघे लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गोदामाला घेरले. तसेच इमारतीभोवती पॅरिस पोलिसांचे दोन हेलिकॉप्टर्स देखरेख करीत होते. 

पोलिसांकडून दोघांनाही आत्मसमर्पण करण्याचेही आवाहन करण्यात आले. परंतु, सुरूवातीला कोणताही प्रतिसाद हल्लेखोरांनी दिला नाही. पॅरिस पोलिसांनी अनेकवेळा आत्मसमर्पणाचे आवाहन केल्यानंतर अखेर दोघांनी फोनवरून पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही 'शहीद होणे पसंत करू' असे पोलिसांना सांगितल्याचे वृत्त आहे. 

दरम्यान, या दोघांनी इमारतीत काही नागरिकांना या दोघांनी ओलिस धरले होते. त्यामुळे पोलिसांनी सावध पवित्रा घेत गोदामात प्रवेश करीत दोघा अतिरेक्यांना ठार करण्यात यश मिळविले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.