रियो दी जेनेरिओ : ब्राझिलला सध्या 'झिका' नावाच्या एका वेगानं फैलावणाऱ्या साथीच्या रोगानं हैराण केलंय.
मच्छरांमुळे 'झिका' हा नवीन वायरस निर्माण झालाय. या वायरसनं खूपच कमी वेळात अनेकांना आपल्या जाळ्यात कैद केलंय. अमेरिका आणि युरोपहून येणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसलाय. परंतु, सर्वात जास्त परिणाम भोगावे लागतायत ते ब्राझिलला... याचे परिणामही ब्राझिलमध्ये दिसून येत आहेत.
'झिका' या वायरसमुळे मोठ्या संख्येत अविकसित मेंदू किंवा असामान्य रुपातले छोट्या डोक्याची मुलं ब्राझिलमध्ये जन्म घेत आहेत. ब्राझिलच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत अशा जवळपास ३८९३ बाळांनी जन्म घेतलाय.
आपल्या आजुबाजुच्या देशांना या वायरसशी लढण्यासाठी एकजूट होण्याचा आग्रह बाझिलनं केलंय. या वायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी लवकरात लवकर यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलंय.
ही स्थित अधिकाऱ्यांना चिंतेत टाकणारी आहे. कारण, हा देश सध्या ऑलिम्पिक खेळाची तयारी करत आहे. ऑगस्ट महिन्यात रियो दी जेनिरिओमध्ये ऑलिम्पिकसाठी जगभरातून हजारो-लोक उपस्थित राहणार आहेत.
लॅटीन अमेरिकेतील जवळपास २० देशांमध्ये हा वायरस फैलावलाय. कॅनडा आणि चिली या देशांत मात्र अजून या वायरसचं सावट फैलावलेलं नाही.