लाहोर : भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीच्या चाहत्याला घरावर भारताचा झेंडा फडकावल्याप्रकरणी दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. २२ वर्षीय उमर दराजला बुधवारी पंजाबच्या ओकारा प्रांतस्थित जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले. त्याला रिमांडमध्ये पाठवण्यात आलेय.
दराजला २६ जानेवारीला अटक करण्यात आली होती. याच दिवशी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना भारताने जिंकला होता. यावेळी दराज विजयाचा जल्लोष करताना घरावर भारताचा झेंडा फडकवला होता. याची खबर मिळताच त्याला घरातून अटक करण्यात आली. कोहलीचा फॅन असल्याने आपणे असे केल्याचे दराजने यावेळी सांगितले.
'मी विराट कोहलीचा चाहता आहे. कोहलीसाठी मी भारतीय टीमला सपोर्ट करतो. कोहलीच्या प्रति प्रेम दर्शविण्यासाठी घरावर तिरंगा फडकावल्याचे' त्याने सांगितले होते.