बाली: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आजही भारतात येण्याची शक्यता नाही. बाली इंटरनॅशनल एअरपोर्ट आकाशात पसरलेल्या ज्वालामुखीच्या राखेमुळं गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंत बंद करण्यात आलंय.
Info Update: Blimbingsari Airport Banyuwangi is closed until tomorrow 5 Nov 8.00am local time, due to the eruption of Mt. Barujari (Rinjani)
— Garuda Indonesia (@IndonesiaGaruda) November 4, 2015
चार्टर प्लेननं मुंबईत आणलं जाईल राजनला
पहिले राजनला मंगळवारी रात्री भारतात आणणार अशी माहिती मिळत होती. मात्र इंडोनेशियामध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं आकाशात राखच राख पसरलीय. पोलीस आपल्या कामावर लक्ष ठेवून आहे आणि त्यांचं लक्ष आता वातावरणावर आहे. आकाश स्वच्छ होताच राजनला भारतात आणलं जाईल. त्याला चार्टर प्लेननं इंडोनेशियाहून मुंबईत आणलं जाईलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, राजनच्या सुरेक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अधिक वाचा - काही मुंबई पोलिसांचेच दाऊदशी लागेबांधे; छोटा राजनचा दावा
अंडा सेलमध्ये राहिल राजन
छोटा राजनला मुंबईच्या ऑर्थर रोड जेलच्या अंडा सेलमध्ये ठेवलं जाईल. मुंबई हल्ल्यातील दोषी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला सुद्धा अंडा सेलमध्ये ठेवलं होतं. ऑर्थर रोड जेल मुंबईतील सर्वात सुरक्षित जेल मानलं जातं. या सेलचा आकार अंड्यासारखा आहे म्हणून त्याला अंडा सेल म्हणतात.
अधिक वाचा - छोटा राजनच्या अटकेमुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलं; दाऊदच्या सुरक्षेत वाढ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.