'व्हॅलेंटाईन-डे'ला ओबामांसाठी मिशेलचा उखाणा

उखाणा ऐकण्यासाठी प्रत्येक जण उत्साही असतो.

Updated: Feb 16, 2016, 09:01 PM IST
'व्हॅलेंटाईन-डे'ला ओबामांसाठी मिशेलचा उखाणा title=

न्यूयॉर्क : उखाणा म्हटला, की सर्वांना ऐकण्याचा उत्सुकता लागून असते, कारण उखाण्यामधून एकमेकांबद्दलचं प्रेम किंवा उणीदुणी दिसून येतात.

(मिशेलचा बराकसाठी उखाणा बातमीच्या सर्वात खालील व्हि़डीओत)

जास्तच जास्त उखाणे हे गंमतीशीर असतात, याच नवरा आणि बायकोला एकमेकांची फिरकी घेता येते, म्हणूनच उखाणा ऐकण्यासाठी प्रत्येक जण उत्साही असतो.

भारतीय संस्कृतीत व्हॅलेंटाईन-डेला महत्व नसलं, तरी अमेरिकेत उखाण्याला मात्र महत्व आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मिशेलसाठी आणि मिशेल यांनी बराक ओबामा यांच्यासाठी काही शब्दात, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेम व्यक्त केलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपली पत्नी मिशेलसाठी एका लाईव्ह कार्यक्रमात हे प्रेम व्यक्त केलं, यातही अचानक एकमेकांना लाईव्ह शोमध्ये समोरासमोर आणण्यात आलं. यानंतर मिशेल आणि बराक ओबामा यांच्यातलं ट्युनिंग पाहण्यासारखं होतं.

पाहा मिशेलचा बराकसाठी उखाणा