www.24taas.com,वॉशिंग्टन
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. बराक ओबामा आणि मिंट रोम्नी यांच्यात अटीतटीची लढत झाली. रोम्नी यांनी सुरूवातीला आघाडी घेतली होती. त्यामुळे बराक ओबामा पुन्हा अध्यक्ष होणार का याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, ओबामा यांनी शेवटी आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यांना ३०३ मते पडलीत.
बराक ओबामा यांनी ट्विट करताना म्हटले आहे, मला पुन्हा निवडून दिल्याबद्दल मी नागरिकांचा आभारी आहे. ओबामा हे अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष आहेत. रोम्नी यांना २०३ मते मिळालीत. एकावेळी रोम्नी पुढे होते. त्यांना २०३ मते पडलीत त्यावेळी ते आणखी मते घेण्याची शक्यता होती. मात्र, त्यांच्या मतांमध्ये वाढच झाली नाही.
अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालांना सुरूवात झाली त्यावेळी वेस्ट वर्जिनियात रोम्नींनी विजय मिळवला होता. इंडियाना - वर्जियानात रोम्नी आघाडीवर तर फ्लोरोडियात ओबामा पुढे होते. विजयासाठी २७० मतांची गरज आहे. सुरूवातीला रॉम्नी (१५३) यांनी ओबामा (१४३) यांच्यावर आघाडी घेतली होती. त्यानंतर अटीतटीच्या लढतीत ओबामा यांनी १६० मते घेवून रॉम्नी यांच्यावर आघाडी घेतली. रॉम्नी यांना १५५ मते मिळाली होती. उटालामध्ये रॉम्नी यांनी विजय संपादन केला.
न्यू हॅम्पशायरमधील डिक्सिव्हिले नॉच हे छोटे गाव १९६०पासून पहिले मत टाकते. आतापर्यंत १३पैकी ७ अध्यक्षांना या गावाने कौल दिला.
बराक ओबामांना विजय मिळालेली राज्य
मिशिगन, इलिनॉइस, न्यूयॉर्क, मायने, मॅसेच्युसेंट्स, डेसावेअर, ऱ्होड आईसलॅंड, व्हॅटमोंट, न्यू हॅम्पशायर, कनेक्टीकट, न्यूजर्सी, मेरीलॅंड, पोनिसिल्विया
रोम्नींना विजय मिळालेली राज्य
साऊष कॅरोलिना, वेस्ट वर्जिनिया, टेक्सास, कॅन्सस नॉर्थ डाकोटा, साऊथ, डाकोटा, ओक्लाहामा, टेक्सास, नेब्रास्का, कॅन्सास, लुझियाना, मिसिसिपी, अलाबामा, जॉर्जिया, टेनिसी, केंटुकी, इंडियाना, उटाह, व्हायमिंग, अर्कासान्स, टेनिसी
मतदान सुरू होण्याआधी ओबामा व रोम्नी दोघांच्याही सर्मथकांनी विजयाचा दावा केला. अमेरिकेत मंगळवारी मतदान सुरू झाले असले तरीही एकतृतीयांश मतदारांनी आधीच मतदान केले आहे. न्यू हॅम्पशायरमधील डिक्सिव्हिले नॉच येथे झालेल्या पहिल्याच मतदानात दोघांनाही पाच, पाच मते मिळाली. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच ही घटना घडली आहे.