'आमचा लढा इस्लामविरोधी नाही' - बराक ओबामा

अमेरिका आणि त्याच्या सहयोगी देशांचा लढा, धर्माची चुकीची व्याख्या करणाऱ्या नागरिकांविरुद्ध आहे,  इस्लाम धर्माविरोधात नाही, असं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलं आहे.

Updated: Feb 19, 2015, 09:15 PM IST
'आमचा लढा इस्लामविरोधी नाही' - बराक ओबामा title=

वॉशिंग्टन : अमेरिका आणि त्याच्या सहयोगी देशांचा लढा, धर्माची चुकीची व्याख्या करणाऱ्या नागरिकांविरुद्ध आहे,  इस्लाम धर्माविरोधात नाही, असं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलं आहे.

व्हाइट हाऊसमध्ये बुधवारी 'हिंसक अतिरेकी प्रवृतीविरोधात लढाई' या विषयावर बोलताना ओबामा यांनी आपले मत व्यक्त केले. इराक आणि सीरियामध्ये इसिसच्या दहशतवाद्यांकडून होत असलेले हल्ले हे क्रुरतेचे दर्शन आहे, असे ओबामा यांनी सांगितले.

ओबामा म्हणाले, 'इस्लामिक स्टेट (इसिस) व अल् कायदा या दहशतवादी संघटेनेचे दहशतवादी स्वतःला धर्माची संरक्षण करणारे पवित्र योद्धा समजत आहेत. कारण, ते स्वतः कसे योग्य आहेत हे सांगण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे इसिस स्वतःला इस्लामिक स्टेट असे संबोधते. अमेरिका व पश्चिमेकडील देश इस्लामविरोधी आहेत, असा अपप्रचार त्यांच्याकडून करण्यात येत आहे. 

या अपप्रचाराच्या आधारे या दहशतवादी संघटना नागरिकांना आपल्या संघटनेत सहभागी करून घेत आहेत. मुस्लिम समुदाय व इतर समुदायाच्या नागरिकांनी दहशतवाद्यांच्या या अपप्रचारावर विश्वास नाही ठेवला पाहिजे. पश्चिमेकडील देश व आधुनिक जीवन हे इस्लामविरोधी आहे, असे म्हणणे चुकीचे आहे.'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.