बॉबी जिंदाल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत

मूळ भारतीय वंशाचे असलेले रिपब्लिकन पार्टीचे वरिष्ठ नेते आणि लुसियाना प्रांताचे सद्य गव्हर्नर बॉबी जिंदाल २०१६ मध्ये अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 23, 2013, 06:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
मूळ भारतीय वंशाचे असलेले रिपब्लिकन पार्टीचे वरिष्ठ नेते आणि लुसियाना प्रांताचे सद्य गव्हर्नर बॉबी जिंदाल २०१६ मध्ये अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत. अमेरिकेतील लुसियानाच्या एका वरिष्ठ सिनेटरनं (सनदी अधिकारी) ही माहिती दिलीय.
‘माझ्या आकलनाप्रमाणे जिंदाल हेही अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. या पदासाठी ते योग्य उमेदवार असून, ते नक्कीच या निवडणुकीत सहभागी होतील. बॉबीमध्ये नेतृत्वगुण चांगले असून, त्याचा मला आदर आहे. राजकारणाबद्दलच्या त्यांच्या सर्व मतांशी मी सहमत आहे. पण, त्यांचा याबाबत वैयक्तिक निर्णय काय असेल, याबद्दल मी सांगू शकत नाही’ असं सनदी अधिकारी डेव्हिड विट्टेर यांनी म्हटलंय.
जिंदाल हेही अमेरीकेचे अध्यक्ष होवू शकतात, असा विश्वास लुसियाना प्रांताच्या कनिष्ठ सिनेटरने व्यक्त केलाय. लुसियाना प्रांताचा जिंदाल यांचा गव्हर्नरपदाचा कार्यकाळ २०१५ मध्ये संपत आहे. ते या ठिकाणी दुसऱ्यांदा गव्हर्नर म्हणून निवडून आले होते. त्यामुळे तिसऱ्यांदा ते ही निवडणूक लढवू शकत नाहीत.
विट्टेर गव्हर्नरपदासाठीच्या निवडणुकीत उभं राहण्याचा विचारात आहेत. ‘मला आशा आहे, की जानेवारीपर्यंत आम्ही एखाद्या निष्कर्षावर पोहचू शकू’ असं त्यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.