लंडन: पहिले कोंबडी की अंडा हा वादाचाच मुद्दा आहे. पण सध्या संशोधकांनी एक नवा शोध लावला असून आता उकडलेलं अंड पुन्हा त्याच्या पूर्वास्थेत म्हणजेज कच्च करता येणार आहे. हा शोध कँसरचा इलाज जैव तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणात खाद्य उत्पादनांमध्ये फायदेशीर ठरणार आहे.
अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सरकारद्वारे अनुदानीत अभ्यासाचे मुख्य लेखक ग्रेगरी वीस यांच्यावतीनं वृत्तपत्र द इंडिपेंडेंटनं सांगितलं, 'हो... आम्ही कोंबडीचं उकडलेलं अंड पूर्वास्थेत आणण्याचा शोध लावलाय. उकडलेल्या अंड्यांच्या पांढऱ्या भागात प्रोटीन असतं. आतापर्यंत अंड पुन्हा जुन्या स्थितीत आणता येवू शकत नाही, असा समज होता. मात्र बातमीनुसार, संशोधकांनी अंड पूर्व स्थितीत आणण्याचा आणि प्रोटीन वेगवेगळं करण्याची पद्धत शोधून काढलीय.'
उकडलेलं अंड फोडण्यासाठी युरियाचा वापर केला आणि त्यावर उच्च दाबाची क्षमता असलेल्या मशीन वोर्टेक्स फ्लूड़ उपकरणचा वापर केला. यानंतर प्रोटीन आपल्या पूर्व स्थितित आलं. या प्रक्रियेद्वारे मिळालेल्या प्रोटीनचा वापर विविध संशोधन आणि निर्माण प्रक्रियेमध्ये क्रांतिकारी परिवर्तन आणू शकतं. सर्वात मओठी बाब म्हणजे अशा प्रक्रियेतून मिळालेल्या प्रोटीननं कँसर सारख्या गंभीर रोगासाठी अँटीबॉडीची निर्मिती केली जावू शकते, जी खूप स्वस्त असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.