याऔंडे : 'बोको हरम' या कट्टर इस्लामी संघटनेच्या दहशतवाद्यांनी कॅमरुनच्या उपपंतप्रधान अमाडो अली यांच्या पत्नीचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. त्यामुळे, या देशात दहशतवाद्यांची मजल कुठवर पोहचलीय याची प्रचिती येऊ शकतेय.
एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी रविवारी एका हल्ल्यानंतर अमाडो अली यांच्या पत्नीचं अपहरण केलंय. या हल्ल्यात जवळपास 10 जण ठार झालेत.
समाचार एजन्सी सिन्हुआच्या माहितीनुसार, कॅमरुनचे सूचना मंत्री इस्सा त्चिरोमा बाकारी यांच्या हवाल्यानं बातमी दिलीय. इस्लामी समूहानं नायजेरियाच्या सीमावर्ती भागालगतच्या उत्तरी शहरात कोलोफाटामध्ये असलेल्या उपपंतप्रधानांच्या निवासस्थानावर हल्ला केला. यावेळी, दहशतवाद्यांनी अली यांच्या पत्नीला जबरदस्तीनं आपल्यासोबत नेलंय.
याशिवाय, दुसऱ्या एका घटनेत दहशवाद्यांनी सेइनि बोऊकर या धार्मिक नेत्याचंही अपहरण केलंय.
पश्चिम आफ्रिकेत नायजेरिया हा कॅमरूनचा शेजारी देश आहे. कॅमरून गेल्या अनेक दिवसांपासून बोको हरम या इस्लामी दहशतवादी संघटनेच्या विविध हल्ल्यांचा सामना करत आहे.
एप्रिल महिन्यात याच संघटनेनं उत्तर नायजेरियातील चिबूकमधील 200 विद्यार्थिनींचं अपहरण केलं होतं. तसंच याच संघटनेनं जूनमध्ये आबुजात घटवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 21 जण ठार झाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.