लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत देशात मध्यावधी सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या आहेत. 8 जून रोजी ब्रिटनमध्ये मतदान होईल.
ब्रेक्झिटसाठी सर्वाधिकार मिळवताना मे यांना संसदेमध्ये विरोधाचा सामना करावा लागला होता. विधेयकात विरोधकांनी सुचवलेले बदलही मान्य करावे लागले. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुनियोजित पद्धतीनं पुढे नेण्यासाठी संसदेमध्ये तगडं बहुमत आवश्यक आहे. त्यासाठी पुन्हा निवडणुकी लावण्यात आल्या आहेत.
काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये दीड-दोन वर्षं आधीच निवडणुकांना सामोरं जाण्याचा निर्णय थेरेसा मे यांनी घेतला. ब्रेक्झिटची प्रक्रिया सुरू असताना मे यांनी केलेल्या या घोषणेबद्दल आश्चर्य व्यक्त होत असलं, तरी विरोधी पक्षांनी मात्र याचं स्वागतच केले आहे.