ब्रिटिश तरुणीचा शीख वृद्धावर हल्ला

लंडनमध्ये १९ वर्षीय ब्रिटीश युवतीनं एका ८० वर्षीय शीख वयोवृद्धास बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. मारहाणीत शीख गृहस्थ गंभीर जखमी झाला असून युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 19, 2013, 09:31 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, लंडन
लंडनमध्ये १९ वर्षीय ब्रिटीश युवतीनं एका ८० वर्षीय शीख वयोवृद्धास बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. मारहाणीत शीख गृहस्थ गंभीर जखमी झाला असून युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
बस स्थानकावर या तरुणीनं या शीख गृहस्थास शिवीगाळ करत बेदम मारलं. तिला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आलीये. या घटनेचे भारतात तीव्र पडसाद उमटलेत. एसजीपीसीचे अध्यक्ष अवतार सिंह मक्कड यांनी या घटनेचा निषेध केलाय. तसंच ब्रिटनच्या पंतप्रधानांना पत्र लिहून या घटनेचा निषेध करणार असल्याचंही म्हटलंय.
रस्त्यावरून चालणाऱ्या शीख ज्येष्ठांच्या अंगावर ही तरुणी धावून गेली. त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारलं. त्यांनी तिला समजविण्याचा प्रयत्न केला. थोडा विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण तिनं त्यांना जमिनीवर ढकलून दिलं. त्यांची पगडी सुटली. या ज्येष्ठाच्या वयाचाही विचार न करता तिनं जवळ जाऊन त्यांना मारहाण केली. त्यानंतर ती मुलगी चक्क त्यांच्या तोंडावर थुंकली. या मुलीचं उद्धट आणि राक्षसी वर्तन एका वाटसरूनं मोबाइलमध्ये चित्रित केलं आणि सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर टाकलं. त्यामुळं या हल्ल्याचा व्हिडिओ उपलब्ध झाला आहे. या मुलीच्या हल्ल्यात त्या वृद्धाच्या नाकातून रक्त येऊ लागले आणि डोळा काळा झाला.

या घटनेमुळं लंडन शहरात खळबळ माजली असून, शीख समाजातील व्यक्तींच्या सुरक्षिततेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.