केपटाऊन ते कैरो... प्रथमच भारतीयांच्या टप्प्यात

वन्यजीवन पर्यटन क्षेत्रात १९९३ पासून आगळ्या वेगळ्या सफारी आयोजित करणाऱ्या 'दामले सफारीज'तर्फे यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर केपटाऊन ते कैरो अशा रोमांचक दौऱ्याचे आयोजन केले आहे.

Updated: Sep 2, 2016, 03:54 PM IST
केपटाऊन ते कैरो... प्रथमच भारतीयांच्या टप्प्यात title=

मुंबई : वन्यजीवन पर्यटन क्षेत्रात १९९३ पासून आगळ्या वेगळ्या सफारी आयोजित करणाऱ्या 'दामले सफारीज'तर्फे यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर केपटाऊन ते कैरो अशा रोमांचक दौऱ्याचे आयोजन केले आहे.

'अतुल्य भारत'ची प्रसिद्धी करणाऱ्या या दौऱ्याचं ब्रीदवाक्य आहे 'फ्रेंडशीप ड्राईव्ह अॅक्रॉस आफ्रीका'... 

'दामले सफारीज'चे भागीदार अनिल दामले यांनी अनंत काकतकर, हुनेद चुनावाला व कौस्तुभ शेजवलकर या आपल्या तीन मित्रांसहीत आपला हा प्रवास आखलाय. 

११ ऑक्टोबर २०१६ ला दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 'काऊन्सिल जनरल ऑफ इंडिया' यांच्या उपस्थितीमध्ये केपटाऊनवरून या अनोख्या प्रवासाला सुरुवात होईल. हा संपूर्ण प्रवास करण्यासाठी वापरली जाणारी पजेरो गाडी २ सप्टेंबर रोजी केपटाऊनकडे रवाना होईल. युरोप आणि अमेरिकेतील मोजक्याच लोकांनी केलेला हा प्रवास प्रथमच भारतीयांकडून होत आहे.


केपटाऊन ते कैरो

दक्षिण आफ्रिका, बोटस्वाना, झाम्बिया, टांझानिया, केनिया, इथिओपिया, सुदान व इजिप्त अशा ८ देशांतून १२८०० किमीचा हा प्रवास केला जाणार आहे. अतिशय दुर्गम प्रदेश, वन्यजीवन पार्कस आणि वाळवंटी प्रदेशातून प्रवास करतांना काफूवे नॅशनल पार्क, नक्सी पॅन नॅशनल पार्कपासून नाईल नदीच्या परिसरातून प्रवास होईल. 

व्हिक्टोरिया फॉल्स, ग्रेट रिफ्ट व्हॅली, गिझा पिरॅमिड अशा जगप्रसिद्ध ठिकाणांनाही या निमित्तानं हे सगळे जण भेट देणार आहेत.