परदेशी चोरांचा भारतीयांवर `ऑनलाईन` दरोडा

तुम्ही ऑनलाईन बँकिंग व्यवहार करणार असला तर शंभर वेळा विचार करा. कारण तुमच्या ऑनलाईन व्यवहारावर सातासमुद्रापार बसून कोणी नजर ठेवत आहे.

Updated: Feb 7, 2013, 02:30 PM IST

www.24taas.com, न्यूयॉर्क
तुम्ही ऑनलाईन बँकिंग व्यवहार करणार असाल तर शंभर वेळा विचार करा. कारण तुमच्या ऑनलाईन व्यवहारावर सातासमुद्रापार बसून कोणी नजर ठेवत आहे. अनेक भारतीयांची क्रेडिट आणि डेबिट कार्ड हॅक करुन ऑनलाईन गंडा घातल्याची धक्कादायक प्रकरणं समोर येऊ लागली आहे.
मुंबई आणि नाशकातल्या दोघांच्या डेबिट कार्डावरुन अमेरिकेत खरेदी करण्यात आली आहे. शिवाय भारतातही ऑनलाईन फसवणुकीच्या घटना उघ़डकीस आल्या आहेत. यावरुन भारतीयांचे ऑनलाईन व्यवहार धोक्यात आल्याचं स्पष्ट झाल आहे. नाशिकमधील चंद्रशेखर कासार यांच्या डेबिट कार्डावरुन अमेरिकेत सहा ऑनलाईन व्यवहार करण्यात आले आहेत.

यामध्ये कासार यांना मोठा आर्थिक फटका बसला नसला तरी त्यांचं खातं असुरक्षित झालं आहे. शिवाय मुंबईच्या सौमेन मुजुमदार यांनाही अमेरिकेतल्या एका ठकानं एक लाख १७ हजारांचा गंडा घातला आहे.