चीनकडून आता भारतीय बनावट नोटा

आधी पाकिस्तान आणि आता चीन. भारताची अर्थव्यवस्था कशी कोसळेल हा या दोन्ही देशांचा हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी आधी पाकिस्तानमधून भारतीय बनावट नोटा येत होत्या. मात्र, आता चीनही याच मार्गावर चालतोय. चीनमधून मोठ्या प्रमाणात भारतीय बनावट नोटा पाठवण्याचे काम सुरु आहे.

Updated: Jul 16, 2013, 01:33 PM IST

b> www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली
आधी पाकिस्तान आणि आता चीन. भारताची अर्थव्यवस्था कशी कोसळेल हा या दोन्ही देशांचा हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी आधी पाकिस्तानमधून भारतीय बनावट नोटा येत होत्या. मात्र, आता चीनही याच मार्गावर चालतोय. चीनमधून मोठ्या प्रमाणात भारतीय बनावट नोटा पाठवण्याचे काम सुरु आहे.
गुप्तचर विगाकाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आयएसआय, तस्करीच्या माध्यमातून, अमली पदार्थांचे व्यापारी, दहशतवादी, शेजारी देशांमधून भारतामध्ये जाणारे गरिब नागरिक आणि पर्यटक यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा भारतात पाठवल्या जातायत. लेह लडाखमधील आणि ईशान्य भारतातील लोक हे चीनी लोकांसारखे दिसतात त्यामुळे याचा फायदा चीनकडून उठविण्यात येत आहे. अनेक चीनी लोकांच्या माध्यमातून भारतात बनावट नोटा पाठवण्याचा उद्योग सुरू आहे, अशी माहिती देण्यात आलेय.
या प्रकरणासंबधी बिरगंज येथील रणजीत याला अटक करण्यात आलीय. त्याच्याकडे लहान मुलांच्या खेळण्या लपवलेल्या तब्बल ३० लाखांच्या बनावट नोटा सापडल्या. या सर्व नोटा त्याला हॉंगकॉंगमधून पाठवण्यात आल्या होत्या. आतापर्यंतच्या तपासातून पाकिस्तानातील कराची, लाहोर तर चीनच्या हॉंगकॉंग आणि झिंजियांगमधून मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा भारतात पाठवल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे.

घुसखोरी, हेरगिरी, नक्षलवाद्याचा वापर करुन चीन भारताविरोधी कारवाया करत होता. आता त्यांनी बनावट नोटांचा आणखी एक मार्ग वापरायला सुरुवात केलीय. त्यामुळे चीनच्या नव्या खेळीची भारतीय सुरक्षा यंत्रणांनी गंभीर दखल घेतलीय. भारतीय अर्थव्यवस्थेतील बनावट नोटांचा सुळसुळाट रोखण्यासाठी उच्चस्तरिय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
अलिकडेच दिल्लीतून ३७ लाख रुपयांच्या बनावट भारतीय नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. जप्त केलेल्या रकमेत हजाराच्या अनेक बनावट नोटा होत्या. या जप्तीनंतर थोड्याच दिवसांत भारत-नेपाळ सीमेवर आणखी ३० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. चीनमधून पाठवण्यात आलेल्या या नोटा नेपाळमार्गे तस्करी करुन भारतात आणण्यात आल्या होत्या.
पाक आणि चीनच्या या हालचाली पाहता भारतापुढचे बनावट नोटांचे आव्हान दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचे गृह आणि संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.