महाराष्ट्रातला पाऊस 'मेड इन चायना'

दुष्काळाग्रस्त मराठवाड्याला चीनने मदतीचा हात देऊ केला आहे. जर महाराष्ट्रा सरकारने होकार दिला तर, कृत्रिम पावसाचे तंत्रज्ञान ‘क्लाऊड सीडिंग’ उपलब्ध करुन देणं, तसेच हवामान विभागातील कर्मचाऱ्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देण्याची ऑफर चीनने महाराष्ट्र सरकारला दिली आहे. यामुळे पुढील वर्षी मराठवाडा दुष्काळमुक्त होईल असा विश्वास चीनने दर्शविला आहे.

Updated: Jun 20, 2016, 09:02 PM IST
महाराष्ट्रातला पाऊस 'मेड इन चायना'

बिजींग : दुष्काळाग्रस्त मराठवाड्याला चीनने मदतीचा हात देऊ केला आहे. जर महाराष्ट्रा सरकारने होकार दिला तर, कृत्रिम पावसाचे तंत्रज्ञान ‘क्लाऊड सीडिंग’ उपलब्ध करुन देणं, तसेच हवामान विभागातील कर्मचाऱ्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देण्याची ऑफर चीनने महाराष्ट्र सरकारला दिली आहे. यामुळे पुढील वर्षी मराठवाडा दुष्काळमुक्त होईल असा विश्वास चीनने दर्शविला आहे.

चीनमधील काही अधिकाऱ्यांसह वैज्ञानिकांनी महाराष्ट्र दौरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. कृत्रिम पावसात हातखंडा असलेल्या चीनच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी महाराष्ट्रासाठी चीन काय मदत करु शकतो असे विचारले.

क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाने चीनमध्ये कृत्रिम पाऊस पाडला जातो. पाऊस पाडण्यासाठी ढगांवर मारा केल्यानंतर कृत्रिम पाऊस पडतो. गेल्या अनेक वर्षांपासून चीन क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.

जर या चर्चांना योग्य वळण मिळाले तर मराठवाड्यात २०१७ मध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊ, असे 'चायना डेली' वृत्तपत्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.