पॉर्न स्टारला व्यावसायिकानं दिली नोकरी, पगार ५० कोटी!

एका व्यावसायिकानं एका पॉर्न स्टारला पर्सनल असिस्टंट म्हणून नोकरीवर ठेवलंय. पण नवल हे आहे की या नोकरीसाठी तिला ५० कोटी रुपये मिळणार आहेत.

Updated: May 16, 2015, 03:53 PM IST
पॉर्न स्टारला व्यावसायिकानं दिली नोकरी, पगार ५० कोटी!   title=

बीजिंग : एका व्यावसायिकानं एका पॉर्न स्टारला पर्सनल असिस्टंट म्हणून नोकरीवर ठेवलंय. पण नवल हे आहे की या नोकरीसाठी तिला ५० कोटी रुपये मिळणार आहेत.

या बदल्यात पंधरा वर्ष ही पॉर्न स्टार या व्यावसायिकाला सेवा देणार आहे. पण, ही सेवा कोणत्या स्वरुपात असेल हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. 

रोला मिसाकी असं या पॉर्न स्टारचं नाव आहे. या ५० कोटींच्या बदल्यात ती काय काम करणार हे स्पष्ट झालेलं नाही. ही पॉर्न स्टार अर्धी जपानी आणि अर्धी रशियन आहे. 

रोला आपल्या अपरिचीत बॉससोबत पेईचिंगमध्ये एका कार्यक्रमात दिसली होती. त्यावेळी तिच्या बॉसने चेहऱ्यावर मास्क घातलं होतं. रोला अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये २०१२ मध्ये आली होती. जपानपासून चीनपर्यंतचे तिचे चाहते तिच्या या निर्णयाने आश्चर्यचकीत झाले आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.