नवी दिल्ली : लडाखच्या बर्तसे परिसरात चिनी सैनिकांनी 17 ऑगस्टला सीमारेषा ओलांडून २५ ते ३० किलोमीटर घुसखोरी केल्याचं वृत्त पीटीआयनं दिले आहे.
बर्तसयाच भागात गेल्या वर्षी चीननं तंबू ठोकले होते. त्यावेळी तीन आठवड्यांपर्यंत परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. लडाखच्या बर्तसे भागात न्यू पेट्रोल स्थित चौकीकडे गस्त घालताना गस्तीदलाच्या पथकाला घुसखोरी झाल्याचं दिसलं. त्यानंतर भारतीय जवानांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली.
सीमेच्या पेट्रोलिंगबाबत चिनशी झालेल्या करारामुळे या घुसखोरीविरोधात भारतीय सैन्याला काहीच करता आले नाही. मात्र लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनी हे वृत्त निराधार असल्याचं म्हटलंय. बर्तसे हा प्रदेश 17 हजार फूट उंचीवर आहे. दरम्यान, चीनी सैन्यानं केलेल्या घुसखोरीची राजकीय पक्षांनी निंदा केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.