पाकिस्तानात ख्रिश्चन गर्भवती महिलेला विवस्त्र फिरवलं

पाकिस्तानात एका 28 वर्षीय ख्रिश्चन गर्भवती महिलेला विवस्त्र करून फिरवलं गेल्याची घटना पुढे आलीय. तिनं दिलेलं काम नीट केलं नाही म्हणून तिच्यासोबत हे कृत्य केलं गेल्याचं समजतंय. 

PTI | Updated: Nov 25, 2014, 09:23 PM IST
पाकिस्तानात ख्रिश्चन गर्भवती महिलेला विवस्त्र फिरवलं title=

लाहोर: पाकिस्तानात एका 28 वर्षीय ख्रिश्चन गर्भवती महिलेला विवस्त्र करून फिरवलं गेल्याची घटना पुढे आलीय. तिनं दिलेलं काम नीट केलं नाही म्हणून तिच्यासोबत हे कृत्य केलं गेल्याचं समजतंय. 

पीडित महिला पंजाब प्रांतातील शेखपुरा जिल्ह्याच्या ख्रिश्चन कॉलनीत राणा टाऊनमधील राहणारी आहे. ती घरगुती नोकर म्हणून काम करत होती. पीडितेचा दावा आहे की, तिला घरमालकाकडून तब्बल अर्धा तास विवस्त्र करवून फिरवलं गेलंय. 

तिचं म्हणणं आहे की,  घरमालकाचा मुलगा तिला बाहेर घेऊन गेला आणि आपल्या चार मित्रांसोबत मिळून तिचे कपडे फाडले. महिलेचं म्हणणं आहे की, आरोपींनी तिला विवस्त्रच रस्त्यावर सोडून दिलं. एका वृद्ध महिलेनं तिला तिचे कपडे दिले. नंतर पीडित महिलेला तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात नेलं. 

आपला पती आणि इतर ख्रिश्चन नेत्यांसोबत आलेल्या पीडित महिलेनं सांगितलं,  " मी दोन महिन्याची गर्भवती होती. या घटनेमुळं माझं बाळ मी गमावलंय. पोलिसांनी आरोपींना अटक केली नाहीय. जर मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करील."

पीडितेच्या नवऱ्यानं सांगितलं की, मेडिकल रिपोर्टमध्ये माझ्या पत्नीच्या शरीरावर जखमेचे पाच घाव पाहिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.