'साठी' सेलिब्रेट करण्यासाठी दाऊदच्या 'ग्रँड पार्टी'चं आयोजन

भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आपल्या वाढदिवसाच्या ग्रँड सेलिब्रेशनची तयारी करतोय, अशी माहिती मिळतेय. 

Updated: Dec 22, 2015, 04:40 PM IST
'साठी' सेलिब्रेट करण्यासाठी दाऊदच्या 'ग्रँड पार्टी'चं आयोजन title=

नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आपल्या वाढदिवसाच्या ग्रँड सेलिब्रेशनची तयारी करतोय, अशी माहिती मिळतेय. 

२६ डिसेंबर हा दाऊदचा वाढदिवस... यंदा दाऊद आपल्या वयाची ६० वर्ष पूर्ण करतोय. सुरक्षा एजन्सिजनं दिलेल्या माहितीनुसार, दाऊदच्या वाढदिवसाचं सिलिब्रेशन एका ग्रँड पार्टीसहीत होणार आहे. ही पार्टी पाकिस्तानात किंवा दुबईत होऊ शकते.

या पार्टीसाठी दाऊदनं तब्बल ६०० जणांना आमंत्रण दिलंय. दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजला जाणाऱ्या छोटा शकीलनं दुबईत एका व्यक्तीला फोन करून दाऊदच्या पार्टीचं आमंत्रण दिलंय... आणखी काही जणांच्या नावांसहीत एक यादीच सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलीय.