नवी दिल्ली : पठाणकोट येथील एअर बेसवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्लाप्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती. भारताने यासाठी पाकिस्तानला अल्टीमेटम देखील दिले होते.
पाकिस्तानने दोषींवर कारवाई करावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील पाकिस्तानला सुनावले होते. यानंतर आता 'भारताने पाकिस्तानकडे केलेली कारवाईची मागणी ही योग्य असल्याचं' मत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकॉईस हॉलंड यांनी व्यक्त केलं आहे.
होलांद ३ दिवसांच्या भारत दौ-यावर आले असून ते प्रजासत्ताक दिनानिमित्त होणा-या राष्ट्रीय संचलनासाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये भारतीय लष्कराबरोबर फ्राँसच्या सैन्यामधील सैनिकांची तुकडीही राजपथावर दिसणार आहेत.
होलांद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाचेही कौतुक केले आहे.