कोट्याधीशांमध्ये मुंबईकर दिल्लीकरही मागे नाहीत

कोट्यधीशांच्या यादीमध्ये मुंबईकर आणि दिल्लीकर अजिबात मागे नाहीत. एशिया पॅसिफिकनं 2016 चा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

Updated: Jan 24, 2016, 07:49 PM IST
कोट्याधीशांमध्ये मुंबईकर दिल्लीकरही मागे नाहीत title=

मुंबई : कोट्यधीशांच्या यादीमध्ये मुंबईकर आणि दिल्लीकर अजिबात मागे नाहीत. एशिया पॅसिफिकनं 2016 चा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टनुसार मुंबई आणि दिल्ली या शहरांमधल्या व्यक्ती आशियातल्या प्रमुख शहरांच्या श्रीमंतांच्या यादीत टॉपमध्ये आहेत. 
मुंबईमध्ये एकुण 41,200 करोडपती राहतात. तर दिल्लीमध्ये 20,600 करोडपती आहेत. कोट्यवधींच्या या यादीमध्ये जपानची राजधानी टोक्यो एक नंबरला आहे. टोक्योमध्ये सगळ्यात जास्त 2,64,000 कोट्याधीश राहतात. या यादीमध्ये मुंबईकर 12व्या नंबरवर आहेत तर दिल्लीकर 20 व्या नंबरवर आहेत. 2010 ते 2015 मध्ये मुंबईत 357 टक्के तर दिल्लीत 335 टक्के दरानं कोट्यवधीशांची संख्या वाढली आहे. 

या रिपोर्टमध्ये ज्यांनी संपत्ती एक कोटी डॉलरपेक्षा जास्त आहे, अशा गर्भ श्रीमंत नागरिकांची संख्याही देण्यात आली आहे. ज्यात हाँगकाँग 1 नंबरवर आहे. हाँगकाँगमध्ये 9650 नागरिक गर्भश्रीमंत आहेत. तर मुंबईमध्ये 2,690 आणि दिल्लीत 1,340 नागरिक गर्भश्रीमंत आहेत. या यादीत मुंबई 8 व्या नंबरवर तर दिल्ली 14 व्या नंबरवर आहे.