www.24taas.com, मुंबई
२६/११ मुंबईवरील आंतकवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीने २००८ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी रेकी केली होती. आणि बाळासाहेबांची झेड प्लस सुरक्षा अगदीच कमकुवत असल्याने त्यांना `टार्गेट` करणं सोपं असल्याचेही त्यानं सागिंतले.
लेखक आणि पत्रकार हुसैन जैदी याचं नवीन पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे, `हेडली अँण्ड आय` या पुस्तकात खुलासा करण्यात आला आहे की, लष्कर-ए-तोयबाच्या सदस्याने जिम इंस्ट्रक्टर आणि शिवसेना कार्यकर्ता विलास याच्या मदतीने उपनगरातील बांद्र्यातील बाळासाहेबांच्या मातोश्री निवासस्थानाची पाहणी केली होती. लेखकाने दिग्दर्शक महेश भट्ट यांचा मुलगा राहुल आणि हेडली यांच्यात असामान्य मैत्री असल्याचाही उल्लेख या पुस्तकात केला आहे.
लाहोरमध्ये हेडलीने गोल्फ खेळायला शिकले होते. त्याने महालक्ष्मी येथील विंलिग्डन स्पोर्टस क्लबमध्येही अनेक वेळा फे-या मारल्या होत्या. मुंबईवर हल्ला करताना विलिंग्डन क्लबसारख्या उच्चभ्रू क्लबवर सुद्धा हल्ला करण्याची त्याची योजना होती. या हल्ल्याची चौकशी सुरु झाल्यानंतर तपास यंत्रणांना फोन कॉल्सचा तपशील हाती लागला. त्यावेळी राहुल भट्टचा मोबाईल क्रमांक समोर अला. त्यानंतर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने राहुल भट्टला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.