www/24taas.com,इस्लामाबाद
पाकिस्तानमध्ये लष्कर ए तोयबाचा संस्थापक हफिज सईद याने, फासावर लटकवलेला दहशतवादी अजमल कसाबसाठी नमाज ए जनाजा अदा केली. यावेळी हजारो लोक उपस्थित होते, असं वृत्त पाकिस्तानातल्या वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलंय.
लष्कर ए तोयबानेच पाकिस्तानातून दहा दहशतवादी मुंबईत पाठवून हल्ला घडवून आणला होता. त्यातल्याच जिवंत पकडलेल्या अजमल कसाबला अखेर फासावर लटकवण्यात आलं. त्यामुळे लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हफिज सईद याने नमाज ए जनाजा अदा केली.
२६/११ चा सूत्रधार हाफीज सईदने नेतृत्व केले होते. मुंबई अतिरेकी हल्ल्यातील फाशी दिलेला अतिरेकी अजमल आमीर कसाब याच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी पाकिस्तानात लाहोर शहराजवळ लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफीज मोहंमद सईद याच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांनी नमाज पढला.
पाकिस्तानातील `डेली एक्स्प्रेस` या ऊदरू दैनिकाने या संबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले. लाहोरजवळील मुरिडके येथील मुख्यालयात जमात-उद-दावाचे दोनदिवसीय प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. या शिबिराच्या शेवटच्या दिवशी कसाबसाठी `गायबाना नमाज-ए-जनाजा` पढण्यात आली. मृतदेहाच्या गैरहजेरीत ही नमाज पढली केले.
२५ वर्षीय अजमल कसाब याला गेल्या बुधवारी पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. कसाब हा लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी होता. मुंबईवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानातून आलेल्या १०अतिरेक्यांमध्ये तो एक होता.