...ही आहे साडे चौदा करोड रुपयांची पर्स!

एका 'लेडीज हॅन्ड पर्स'ची किंमत किती असू शकेल? अंदाजा लावण्याआधी साडे चौदा करोड रुपयांची पर्सही बाजारात आहे, हे तुम्हाला समजलं तर...

Updated: Jun 2, 2015, 02:26 PM IST
...ही आहे साडे चौदा करोड रुपयांची पर्स! title=

हाँगकाँग : एका 'लेडीज हॅन्ड पर्स'ची किंमत किती असू शकेल? अंदाजा लावण्याआधी साडे चौदा करोड रुपयांची पर्सही बाजारात आहे, हे तुम्हाला समजलं तर...

तोंड सताड उघडं राहिलं ना... पण, अशी पर्स आहे... हाँगकाँगमध्ये एका पर्सचा नुकताच लिलाव झालाय. यामध्ये, एका पर्सची किंमत तब्बल 14.5 करोड रुपये इतकी ठरली.

या पर्सचं वैशिष्ट्य म्हणजे मगरीच्या कातड्यापासून ही पर्स बनवण्यात आलीय. या बॅगेवर 18 कॅरेटचं सोनं आणि हिऱ्यांचाही वापर करण्यात आलाय.  

ही जगातील आत्तापर्यंतची सर्वांत महागडी पर्स ठरलीय. यापूर्वी, सर्वात महागडी पर्स अमेरिकेत विकली गेली होती... तीही 12 करोड रुपयांना.... लाल रंगाची ही बॅगदेखील मगरीच्या कातड्यानं याच कंपनीनं बनवली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.