अंकारा, तुर्की: तुर्कस्तानातल्या अंतल्यामध्ये जी-२० परिषद ISISच्या टार्गेटवर असल्याचं स्पष्ट झालंय. आज ही परिषद सुरू होत असतानाच दक्षिण तुर्कस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला झालाय.
आणखी वाचा - पॅरिस हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल
ISISचे अतिरेकी दडून बसल्याचा संशय असल्यामुळे पोलिसांनी एका इमारतीवर छापा टाकला. त्यावेळी आतल्या अतिरेक्यांनी आत्मघातकी स्फोट घडवला. यात ४ पोलीस जखमी झालेत. मात्र या घटनेमुळे ISISचं तुर्कस्तानातलं अस्तित्व समोर आलंय. जी-२० परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह देशभरातल्या २० प्रमुख देशांचे नेते उपस्थित आहेत.
आणखी वाचा - VIDEO : पॅरीसच्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा हाच तो पहिला व्हिडिओ
परिषद सुरू होण्याच्या दिवशीच दक्षिण तुर्कस्तानात झालेल्या हल्ल्यामुळे परिषदेची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलीये.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.