काठमांडू : नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यासाठी नेपाळमध्ये दाखल झालेत. मोदींच्या नेपाळ दौऱ्याचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे मोदी त्यांचा धर्मपूत्र जीत बहादूर हासुद्धा त्यांच्यासोबत आहे. नेपाळमध्ये दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम नरेंद्र मोदींनी जीत बाहदूर याची त्याच्या कुटुंबीयासोबत भेट घडवून आणलीय.
कोण आहे हा जीत बाहादूर?
गरीबीमुळे कामाच्या शोधात लहान वयात जीत भारतात आला होता. मात्र, कुठेच काही काम मिळत नसल्यानं त्याने राजस्थाहून गोरखपूरसाठी रेल्वे पकडली. मात्र, जीत ज्या गाडीत बसला होता ती गाडी गुजरातला जाणारी होती. गुजरातला भटकत असताना एका महिलेची नजर जीतवर पडली. आणि त्या महिलेनच जीतची भेट १९९८ मध्ये नरेंद्र मोदींशी करून दिली आणि जीतच भाग्यचं बदललं. जीतच्या शिक्षणापासून ते राहण्या-खाण्यापर्यंतचा सर्व खर्च मोदींनी करून त्याला घडवलंय.
जीद बहादूरच्या सहा बोटांची ओळख...
जीत बाहदूर याची त्याच्या कुटुंबीयासोबत भेट घडवून देण्यास मोदी उत्सुक आहेत. त्यामुळे मोदींनी जीत बहादूरविषयी अनेक ट्विट केलेत. काही वर्षापूर्वी जीत बाहदूर याच्या कुटुंबीयांना शोधण्यात आम्ही यशस्वी झालो ते त्याच्या तळपायाला असलेल्या सहा बोटांमुळे... असं ट्टिवटही मोदींनी केलंय. तसेच ईश्वरच्या प्रार्थनेमुळेच १२ वर्षापूर्वी असाहय असलेल्या मुलाला आपण वाढवल्याचं मोदींनी सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.